अमोल कोल्हे यांचा शिरूर हवेली प्रचाराचा धडाका सुरु

मांजरी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडेगट आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक, रोड शो व सेल्फी फोटोशेशन करत दिवसभर हडपसर विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. बेरोजगारी, सार्वजनिक अनारोग्य आणि वाहतूक कोंडी या प्रमुख तीन समस्यांवर जोर देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, शाहराध्यक्ष चेतन तुपे, माजी राज्यमंञी बाळासाहेब शिवरकर, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर निलेश मगर, नगरसेवक योगेश ससाणे, बंडू गायकवाड, पूजा कोद्रे, फारूक इनामदार, आनंद अळकुंटे, जिल्हापरिषद सदस्य दिलीप घुले, पंचायत समिती सदस्य अजिंक्य घुले, प्रशांत तुपे, बाळासाहेब कोद्रे, रोहिणी तुपे आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, दुपारी सावली फाउंडेशन येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना कोल्हे म्हणाले, “पंधरा वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर शिरूर लोकसभा निवडणूक ही आता लोकांनी हातात घेतली आहे. चांगले वाईट ते ठरविणार आहेत. मला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.’

%d bloggers like this: