कांगारू मायदेशातही पराभूत; दक्षिण आफ्रिका संघाची सांघिक कामगिरी

पर्थ :

आजपासून सुरू झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला.

बॉल टेम्परिंग प्रकरणापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची कामगिरी दिवसेंदिवस खराब होत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड चिंतेत असताना मायदेशातच पराभव पत्करावा लागल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेटची चिंता आणखीनच वाढली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भेदक मारा केला.

दक्षिण आफ्रिकेचा ‘स्टेन गन’ अशी ओळख असलेल्या डेल स्टेनने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के देत चांगली सुरवात करून दिली.

ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही.
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 38.1 षटकात 152 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलिया संघाकडून कुल्टर नाइलने सर्वाधिक 31 चेंडू 34 धावांची खेळी केली.

पेहलूकवायोने 33 धावात 3 फलंदाजांना बाद केले. त्याला डेल स्टेन, लुंगी नंगीडी, इमरान ताहीरने 2-2 गडी बाद करत चांगली साथ दिली.

पेहलूकवायो,डेल स्टेन, लुंगी नंगीडी, इमरान ताहीर यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 152 धावात गारद केले.

153 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या डीकॉक आणि हेंड्रिक्स या सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरवात करून दिली.

डीकॉक आणि हेंड्रिक्स या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 16.4 षटकात 94 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

यष्टीरक्षक डीकॉकने 40 चेंडूत 7 चौकारासह 47 धावांची खेळी केली. त्याला हेंड्रिक्सने सावध खेळ करत 74 चेंडूत 44 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

कुल्टर नाइलने डीकॉकला झेलबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. तर दुसरा सलामीवीरांनी हेंड्रिक्स स्टोयनिसचा शिकार झाला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्करमने 32 चेंडूत 36 धावांची उपयुक्त खेळी करून स्टोयनिसचा शिकार झाला.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने 24 चेंडूत नाबाद 10 धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

या विजयाबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने 1-0 अशी आघाडी घेत मालिकेत विजयी सलामी दिली.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 9 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार सकाळी 8:50 ला अँडलेटच्या ओवल मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

%d bloggers like this: