जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखे यांनी केला आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ.सुजय विखे यांनी नुकताच अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, असे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता दिल्लीगेटपासून मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली. दिल्लीगेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत ही रॅली नेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्य शशिकांत गाडे, धनश्री विखे उपस्थित होते.

सुजय विखे यांच्या समर्थनार्थ नगरकरांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

%d bloggers like this: