पुण्याचा उमेदवार 3 तारखेला अर्ज भरणार : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : ”मोठ्या शहरांमध्ये आम्हाला खूप अपयश आले. भाजपचे वातावरण असल्याने शहरी भागात भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे शहरी भागात निकराची लढाई लढणार आहोत. मी पुण्यासाठी दोन नावे सुचविली आहेत. लवकरच नाव जाहीर होईल. पुण्याचा उमेदवार लवकर जाहीर करण्यात येईल आणि 3 एप्रिलला उमेदवार अर्ज भरणार आहे”,अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.​

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (सोमवार) सकाळ कार्यालयाला भेट दिली. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत पुण्यातील उमेदवाराबाबतही माहिती दिली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ”गेल्या पाच वर्षांत मोदींची काम करण्याची पद्धत पाहिली तर त्यांची हुकुमशाही वृत्ती दिसून येते, नोटाबंदी, शेतकऱ्याबाबतचे धोरण, संस्था नष्ट करण्यात आल्या. मोदींच्या ताब्यात संस्था गेल्या आहेत. हुकुमशाहीकडे प्रवास त्यांचा असून, निम्मा प्रवास झाला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत व संविधान राहणार नाही. पुन्हा निवडणुका होणार नाहीत या माझ्या विधानावर मी आजही कायम आहे

%d bloggers like this: