विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताचा दारुण पराभव; जसप्रीत बुमराहचे यशस्वी पुनरागमन

 

गेहूंजे –

पुण्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाने भारताचा 43 धावांनी पराभव करत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडीज संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र शाय होप आणि हेटमायर यांनी डाव सावरत चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या सामन्यात झुंजार शतक करणारा शाय होपने आजच्या सामन्यातही आपला जलवा दाखवला. शाय होपने 113 चेंडूत 95 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले. त्याला बुमराने त्रिफळाचीत करत मोठा अडथळा दूर केला.

शेवटच्या षटकांनमध्ये अश्ले नर्स याने फटकेबाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्यांनी 22 चेंडूत 40 धावांची खेळी केली.

शाय होप आणि नर्सच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडीज संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 283 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.

भारताकडून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह ने आपल्या दहा षटकात 35 धावा देत चार गडी बाद करत यशस्वी पुनरागमन केले. त्याला कुलदीपने दोन बळी घेत चांगली साथ दिली.

284 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्माला कर्णधार जेसन होल्डरने त्रिफळाचीत करत वेस्टइंडीज संघाला चांगली सुरुवात करून दिली.

कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवने भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. शिखर धवन चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळ करण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरला.

एका बाजूने भारताचे फलंदाज बाद होत असताना विराट कोहलीने पुन्हा एकदा डावाची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली.

धावांचा पाठलाग करताना भारताची मधली फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. टी-ट्वेंटी मध्ये डच्चू मिळालेल्या महेंद्रसिंग धोनीला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी होती. मात्र तोही अपयशी ठरला. धोनी 7 धावावर होल्डरचा शिकार झाला.

विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतले 38 वे शतक झळकावत सलग तीन शतके करण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

सर्वाधिक शतके श्रीलंकेचा कुमार संगकाराच्या नावावर असून त्याने सलग चार शतके लगावली आहेत.

ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने भारताचा 43 धावांनी पराभव झाला.सम्यूअल्सने मॅजिक स्पेल करत 3.4 षटकांत 12 धावांत भारताचे तीन गडी बाद केले. यात कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे.

%d bloggers like this: