शाहरुख खानचा ‘झीरो’ प्रदर्शनापूर्वीच अडचणीत

आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, आगळी वेगळी रूपरेषा असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद दिसून आला होता.

परंतु प्रदर्शनाआधीच चित्रपट एका वादात सापडला आहे. शाहरुख खान या चित्रपटातून ‘बव्वा सिंग’ नामक बुटक्या व्यक्तीची रुपरेषा साकारतोय,शाहरुख ने साकारलेल्या या भूमिकेमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे दिल्ली शिख गुरुद्वारा व्यवस्थापकीय मंडळाचे सचिव मंजिंदर सिग सरसा यांनी म्हंटले आहे.

झीरो या चित्रपटामध्ये शाहरुख खान याने पोस्टर मध्ये चुकीचे ‘किरपानं’ धारण केले आहे त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यावर आणि दिग्दर्शकावर नॉर्थ अव्हेन्यू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

यावर कार्यवाही न झाल्यास चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचाही इशारा सिग यांनी यावेळी दिला.

हिंदी चित्रपट आणि त्यावर घेतले जाणारे आक्षेप आपण या आधी अनेक सिनेमांच्या वेळेस पाहिले आहे,तसेच काहीसे चित्र ‘झीरो’ च्या प्रदर्शनाआधी पाहायला मिळतंय.या आधी माय नेम इज खान, राम लीला, पद्मावत अशा अनेक हिंदी चित्रपटांना प्रदर्शनासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

चित्रपट निर्माता शाहरुख खान आणि दिग्दर्शक आनंद एल राय यावर काय तोडगा काढणार याकडे सर्व सिनेसृष्टीत लक्ष लागून आहे.

%d bloggers like this: