ही तर लाचार सेना – नवाब मलिक

कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर शिवसेनेकडून केली जात होती. मात्र, आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गुजरातमध्ये गेले. त्यांच्या या भूमिकेवर त्यांनी टीका केली. शिवसेनेने भाजपसमोर लोटांगण घातले आहे; हे त्यांच्या जाण्याने समोर आल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएचे घटकपक्ष बोलाविण्यात आले. यावरून अमित शहा अडचणीत आहेत, हे दिसून येत आहे. कालपर्यंत गांधीनगरमध्ये कुणीही प्रचाराला यायचे नाही, ही भाजपची भूमिका राहिली होती. परंतु, आज सर्व घटकपक्षांच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आले, यावरून अमित शहा हे अडचणीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

%d bloggers like this: