‘सेलफोन युज करनेवाला हर आदमी हत्यारा होता है..’ 2.0 चा फनटास्टिक ट्रेलर रिलीज

भारतीय सिनेसृष्टीतील बहुप्रतिक्षित सिनेमा 2.0 चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला, या सिनेमात सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार ही तगडी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा रजनीकांतच्या रोबोटचा सिक्वेल आहे.

2.0 च्या ट्रेलरवरुन यात अॅक्शन बरोबरच सायन्स फिक्शन देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात व्हीएफएक्स इफेक्टची भरपूर जादू पाहायला मिळणार आहे. यात व्हीएफएक्सवर तब्बल 544 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर शूटिंगसाठी 50 कोटीचा सेट उभारण्यात आला होता.

‘सेलफोन युज करनेवाला हर आदमी हत्यारा होता है..’ या अक्षय कुमारच्या डायलॉगने या सिनेमाच्या स्टोरीचा अंदाज येतो, डॉ. रिचर्ड ही डार्क शेड असलेली भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. यात डॉ. रिचर्ड टेलीकॉम कंपन्यांचा सूड घेण्यासाठी सगळ्या लोकांच्या हातून मोबाइल हिसकावून घेतो. ट्रेलरवरुन हा सिनेमाची कथा मोबाइल भौवती फिरते असे दिसते.

Content Middle Property

हा सिनेमा तमिळ, तेलगू, हिंदी या 3 भाषांमध्ये रिलीज होणार आहे, या सिनेमाला एआर रेहमानने संगीत दिले आहे. यातील हिंदी भाषेतील सिनेमातील प्रॉडक्शन धर्मा प्रॉडक्शन करत आहे. तर दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे.

व्हीएफएक्सची जादू आणि सुपरहीरोचा अॅक्शन ड्रामा घेऊन हा सिनेमा 29 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Paint Ad
%d bloggers like this: