तब्बल बारा वर्षानंतर ‘या’ मैदानावर होणार एकदिवसीय सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना वानखेडेऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर घेण्यात येणार असून तब्बल 12 वर्षानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना ‘ब्रेबॉर्नवर’ होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील 5 नोव्हेंबर 2006 ला खेळलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवरचा शेवटचा एकदिवसीय सामना ठरला होता.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्टइंडीज संघाचा 8 गडी राखून पराभव करत 2006 च्या चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. हा सामना पाहण्यासाठी तब्बल 26 हजार प्रेक्षेकांनी हजेरी लावली होती.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीस संघाने प्रथम फलंदाजी करत 30.4 षटकात 138 धावा केल्या होत्या.

पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलिया संघासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 35 षटकात 116 धावांचे आव्हान देण्यात आले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

11 धावांत 2 बळी आणि 57 धावांची खेळी करणाऱ्या अष्टपैलू शेन वॉटसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिला कसोटी सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 9 डिसेंबर 1948 ला खेळला होता. तर शेवटचा कसोटी सामना भारत विरुद्ध श्रीलंका 2 डिसेंबर 2009 ला खेळला होता.

पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 23 ऑक्टोबर 1983 साली खेळला होता. तर शेवटचा एकदिवसीय सामना 5 नोवेंबर 2006 वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाला.

2006 नंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडीज यांच्यामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज दीड वाजता खेळवण्यात येणार आहे.

%d bloggers like this: