विराट कोहलीला GOAT म्हणल्यामुळे बीसीसीआय ट्रोल… काय आहे GOAT ?

विशाखापट्टणम येथे भारत आणि वेस्ट वेस्टइंडीज यांच्यामधील झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 157 धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 205 डावात दहा हजार धावांचा टप्पा पार केला.

त्यानंतर बीसीसीआयने विराट कोहली चा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘GOAT’ असे कॅप्शन दिले. त्यानंतर ट्विटरवरील क्रिकेटप्रेमींमध्ये रिट्विटला उधाण आले आणि एकच चर्चा सुरू झाली.

काय आहे ‘GOAT’ संकल्पना – 

यापूर्वी भारताकडून सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर ,राहुल द्रविड यांनी दहा हजार धावांचा टप्पा पार केला असून दहा हजार धावा करणारा विराट त्यांच्या पाठोपाठ चौथा भारतीय खेळाडू ठरला.विराट कोहलीने 213 एकदिवसीय सामन्यात 59.17 च्या सरासरीने 10000 धावा केल्या आहेत.

सर्वात कमी डावात दहा हजार धावा करणारा विराट जगातला पहिलाच खेळाडू ठरला.यामुळे BCCI ने विराट कोहलीचा फोटो ट्वीटर वर शेअर करत GOAT असे कॅप्शन दिले.GOAT म्हणजे ‘Greatest Of All Time’

यावर आपल्या प्रतिक्रिया देत अनेक क्रिकेटप्रेमींनी बीसीसीआयला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली.


हे ही वाचा – 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्याचा महेंद्रसिंग धोनीला निवृत्तीचा सल्ला

भारतावर सागरीमार्गाने दहशतवादी हल्ला करण्याचा कट, गुप्तचर यंत्रणेचा सावधानतेचा इशारा


 

%d bloggers like this: