महाराष्ट्राचा कौल सांगतोय 2019 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान

एबीपी माझा आणि सी-वोटर यांनी घेतलेल्या सर्वेमधील लोकांचा कौल

2019 ची लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी सगळ्या पक्षांनी रस्त्यावर उतरून प्रचाराचा नारळ फोडला आहे. 2019 मध्येच लोकसभेबरोबर काही राज्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा कल नक्की काय? कोणाला खुर्ची आणि कोणाला मिर्ची? हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा आणि सी-वोटर यांनी केला आहे. या सर्वेमध्ये महाराष्ट्राने केंद्रात आणि राज्यात यंदाही भाजपचीच सत्ता येईल असा कौल दिला आहे.

भाजपला आणि एनडीए मित्रपक्षातील ऐकी राजकरणाला अनुकूल राहिली तर एनडीएला 300, यूपीएला 116 आणि इतर पक्षांना 127 जागा मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त होतो आहे.

महाराष्ट्रात भाजप शिवसेना यांची तू तू मैं मैं चालली असताना जर शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेला नुकसान होऊ शकते असे दिसते आहे, तसे झाले तर शिवसेनेला फक्त ५ जागा मिळतील असा अंदाज आहे.

जर महाराष्ट्रात भाजप शिवसेना युती झाली तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या 34 जागा आणि यूपीएला 14 जागा मिळतील असा अंदाज आहे.

जर सर्व पक्षांनी स्वबळचा नारा दिला तर भाजपला-मित्रपक्षांना 23 जागा, काँग्रेस-मित्रपक्षांना 14  जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मोदींचा कारभार समाधानकारक?

आज देखील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती आहे. या सर्वेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार समाधानकारक आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यात मोदींचा कारभार समाधानकारक आहे असे वाटणारे 64 टक्के आहेत. तर 35 टक्के लोकांना मोदींचा कारभार असमाधानकारक वाटतो.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसे सोबत?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसेला सोबत घ्यायचे का? असा प्रश्न देखील या सर्वेमध्ये विचारण्यात आला होता. 46.3 टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले तर 48.1 टक्के लोकांनी नाही उत्तर दिले.

राज्यात सक्षम नेता कोण? 

राज्यात सर्वात सक्षम नेता म्हणून 19.3 टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांना कौल दिला तर शरद पवार यांना 18.6 टक्के मतदारांनी पसंती दिली. उद्धव ठाकरे यांना 11.8 टक्के मतदारांनी सक्षम नेता म्हणून कौल दिला.

%d bloggers like this: