इस्लाममधील महिलांनी नेल पॉलिश लावू नये असा ‘देवबंद’चा अजब फतवा जारी

महिलांनी आपल्या नखांना नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदीचा वापर करावा असा अजब फतवा दारुल उलूम देवबंदने मुस्लिम महिलांसाठी काढला आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे अशाप्रकारचे फतवे या आधी देखील ‘देवबंद’कडून काढण्यात आले आहेत.

मुफ्ती इशारार गौरा यांनी मुस्लिम महिलांनी नेल पॉलिशचा वापर करू नये. कारण इस्लाममध्ये असा प्रकार करणे मान्य नाही. नेल पॉलिशऐवजी महिलांनी आपल्या नखांना मेहंदी लावावी असा युक्तिवाद करत नव्या वादला तोंड फोडले आहे.

Content Middle Property

या आधी इस्लाममधील महिलांवर निर्बंध घालणारा फतवा – 

इस्लाम मधील महिलांनी पुरुषांचा फूटबॉल पाहू नये, उघड्या गुडघ्यांनी फुटबॉल खेळणा-या पुरुषांना पाहणे हे इस्लामच्या नियमांविरोधात आहे असे देवबंदचे मुफ्ती कासमी म्हणाले होते. एवढेच काय तर टीव्हीवरील फुटबॉल सामने पाहणे देखील महिलांसाठी निषिद्ध आहे असे त्यांचे मत आहे.

व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घालणारे दारूल देवबंदचे फतवे –

  • लोकांची दाढी करणारे हे देखील इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे दारूल देवबंदकडून सांगण्यात आले होते. तसा फतवा या आधी काढण्यात आला होता, तसेच सलून चालवणार्‍या पुरुषांनी ते सोडून दुसरा रोजगार शोधावा असे देखील दारूल देवबंदकडून सांगण्यात आले होते.
  • तसेच कृत्रिम केसांचा टोप लावून नमाज पठण करू नये असा फतवा देखील या आधी काढण्यात आला होता.  इस्लाममध्ये नमाज करण्यापूर्वी हात पाय धुणे आवश्यक मानले जाते, कृत्रिम केसाचा टोप घातल्याने पाणी त्वचेपर्यंत पोहचत नाही, त्यामुळे शरीर अशुद्ध राहते असा दावा करत देवबंदकडून फतवा काढण्यात आला होता.
Paint Ad
%d bloggers like this: