ठरलं रे ! प्रियांका चोप्रा – निक जोन्सच्या लग्नाची तारिख पक्की, या राज्यात होणार शुभमंगल सावधान

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या साखरपुड्यानंतर आता या कूल जोडीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. हे लग्न कुठे होणार याची चर्चा सुरू असताना ते स्थळ राजस्थानातील जोधपूर असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी दोघेही जोधपूर येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करतानाही दिसले. लग्नाचे डेस्टिनेशन पाहण्यासाठी ती जोधपूरला आल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. त्याला कारण देखील तसेच आहे, निक आणि प्रियांका उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगढच्या किल्ल्यात फेरफटाका मारताना आणि तिथल्या मॅनेजमेंटशी चर्चा करताना देखील दिसले आहेत.

वृत्तानुसार प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये लग्न करणार आहेत. 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाचे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. एका पॅलेसमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार असल्याचे समजते आहे.  दोघांनी आपल्या लग्नाच्या तयारीची जबाबदारी स्वत: घेतली आहे. त्यासाठी जोन्स मुंबई मध्ये आला होता. लग्नाच्या सर्व गोष्टीत ते स्वत: बारीक लक्ष घालणार आहे.

Content Middle Property

18 ऑगस्टला प्रियांका -निकचा साखरपूडा पार पडला होता. या सोहळा घरातल्या घरात आणि काही मित्रांच्या उपस्थिती पार पडला होता. सगळ्यांचे लक्ष प्रियांकाच्या लग्नाकडे लागले होते दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर लग्नाची तारीख ही पक्की झाली आहे.


हे ही वाचा – 

Anil Kumble Birthday:- अनिल कुंबळेच्या नावावरील तो रेकाॅर्ड 21 वर्ष अबाधित होता

‘कोहिनूर’ हिरा कसा लागला इंग्रजांच्या हाती, उलगडले गूढ

या कारणामुळे कन्हैया कुमारला होऊ शकते अटक

Man Booker Prize 2018 :- 50 वा मॅन बुकर मिळवणाऱ्या एना बर्न्स ठरल्या पहिल्या नाॅर्थ आयरिश महिला


 

Paint Ad
%d bloggers like this: