भारताला 17 सुवर्णपदकं मिळवून देणाऱ्या ‘अर्जुन’ पुरस्कार सन्मानित खेळाडूला विकावी लागते रस्त्यावर कुल्फी

भारत देशाला बॉक्सिंगमध्ये 17 सुवर्णसह 23 पदकं मिळवून देणारा अर्जुन पुरस्काराने सन्मानित असणारा हरियाणाचा दिनेश कुमारला ‘कुल्फी’ विकावी लागत असल्याने भारत देशाची ‘क्रिडाक्षेत्राविषयी’ असणारी जागृकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

हरियाणा राज्यातल्या अनेक खेळाडूंचे भारत देशाला सन्मान मिळवून देण्यात मोठे योगदान आहे.विजेंदर सिंग आणि सुशील कुमार यांसारख्या बॉक्सरांचा भारतीय बॉक्सिंगला नव्या उंचीवर पोहोचवण्यात  मोलाचा सहभाग आहे.

जागतिक बॉक्सिंगने काही खेळाडूंना सन्मान, गौरव मिळवून दिला तर काही खेळाडूंची नावे गुलदस्त्यातच राहिली.

असाच एक हरियाणा राज्याचा खेळाडू आहे ज्याने भारत देशाला 17 सुवर्ण पदकं मिळवून दिली. तरीसुद्धा त्याला विजेंदर सिंग आणि सुशील कुमार सारखी प्रसिद्धी मिळाली नाही.

बॉक्सर दिनेश कुमारला आजही राज्यातल्या भिमाने गावात दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी 30 वर्षीय दिनेशला रस्त्यावर येऊन ‘कुल्फी’ विकावी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपल्या मुलाला वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी दिनेशच्या वडिलांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी कर्ज काढले होते. तेच कर्ज फेडण्यासाठी दिनेश वडिलांबरोबर रस्त्यावर कुल्फी विकतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे या घटनेला दुजोरा मिळाला.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिनेशने मी आत्ताच्या आणि या पूर्वीच्या दोन्ही सरकारला मदत मागितली होती. मात्र मला कोणाकडूनही मदत मिळाली नसल्याचे सांगितले.

प्रशिक्षक म्हणून मला सरकारने नोकरी दिली तर माझे देशासाठी बॉक्सर घडवण्याचे स्वप्न ही पूर्ण होईल, तसेच माझा उदरनिर्वाह होईल. अशी ईच्छा दिनेशने बोलून दाखवली आहे.

काही वर्षांपूर्वी दिनेश कुमारचा रोड अपघातात झाल्याने दिनेश कुमारची बॉक्सिंगची कारकीर्द संपुष्टात आली.

देशाचं नाव रोशन करणाऱ्या अनेक खेळाडूंचे आयुष्य दिनेशसारखेच गुलदस्त्यात राहिले असून. दिनेश कुमारची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही देशात अनेक घटना अशा घडल्या आहेत.

दिनेश कुमारने भारताला १७ सुवर्ण पदकं, 1 रजत पदक आणि 5 कांस्य पदकं अशी एकून २३ पदकं मिळवून दिली आहेत. या कामगिरीमुळे त्याला भारत‌ सरकारने ‘अर्जुन’ पुरस्कारने सन्मानित केले होते.

%d bloggers like this: