टाळ्या, शिट्ट्या वाजवायला तयार राहा; काशिनाथ घाणेकर येतायेत, ट्रेलर झाला रिलीज

मराठी रंगभूमीला सोनेरी दिवस आणणारे पहिले सुपरस्टार डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

चित्रपटात सुबोध भावे डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत आहे. 1960 च्या दशकातील काशिनाथ घाणेकरांचा रंगभूमीवरील जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरवरुन समजते. त्याचप्रमाणे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील घाणेकर यांनी साकारलेल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेची झलक ट्रेलरमध्ये दिसून येत.

‘लाल्या’ची कारकीर्द कशी सुरू झाली? भालजी पेंढारकर तसेच डॉक्टर श्रीराम लागू अशा दिग्गजांच्या जीवनप्रवासातील चढउताराचा प्रवास ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांना थेट सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.

‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. तर वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि श्री गणेश मार्केटींग अँन्ड फिल्मस् यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

सिनेमात सुबोध भावे शिवाय सुमीत राघवन हा डॉ. श्रीराम लागू, मोहन जोशी हे भालजी पेंढारकर, सोनाली कुलकर्णी ही सुलोचना दीदी, आनंद इंगळे हे वसंत कानेटकर आणि प्रसाद ओक हा प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत दिसतील.

 

%d bloggers like this: