#Metoo :- कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्राकडून समितीची स्थापना

#Metoo मोहिमेअंतर्गत भारतात अनेक महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवल्यानंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या तपासणीसाठी केंद्रसरकारकडून आता एक समितीचे गठन करण्यात येणार आहे असे  केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी संगितले होते.

त्यानंतर कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी आणि  त्यासंबंधित कायदेशीर व संस्थात्मक चौकट बळकट करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा समावेश आहे.

“MeToo मोहिमेअंतर्गत महिलांना लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी ताकद मिळाली आहे, याचा मला आनंद आहे” असे केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी म्हणाल्या होत्या.

मेनका गांधी हे देखील म्हणाल्या की, लैंगिक शोषणाचे दु:ख समोर येऊन बोलून दाखवणार्‍या महिलांचे दु:ख मी समजू शकते. लैंगिक शोषणाच्या घटनामध्ये आपल्याला झिरो टोलरन्सचे धोरण आखण्याची गरज आहे.

Metoo मोहिमेअंतर्गत केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांना देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. पुण्यात देखील सिंबायोसिस महाविद्यालयातील तरुणींनी महाविद्यालयातील प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

त्यानंतर आता लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या तपासणीसाठी केंद्रसरकारकडून आता एक समितीचे गठन करण्यात आले आहे.


हे ही वाचा –

महाराष्ट्राचा कौल सांगतोय 2019 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान

#Metoo अमेरिकास्थित महिला पत्रकाराचा एम जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप


 

%d bloggers like this: