अभिनेते अनुपम खेर यांनी ‘एफ टी आय’च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; एफ टी आय चे पुढे काय?

उपाध्यक्ष पदी अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांची निवड

सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विदेशात चित्रीकरणासाठी वेळ द्यावा लागत असल्याने याकडे लक्ष देणे शक्य नसल्याचे सांगत खेर यांनी ट्विटरवर आपले राजीनामा पत्र प्रसिद्ध केले.

याआधी अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे एफ टी आयमध्ये सतत आंदोलन पाहायला मिळाली त्यामुळेच 2017 मध्ये अनुपम खेर यांच्याकडे एफ टी आयची जबाबदारी देत अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र अनुपम खेर हे आपल्या आगामी अमेरिकन शो ‘न्यू ॲम्स्टरडॅम’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्यामुळे वेळेच्या नियोजनाअभावी त्यांनी एफ टी आयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

एफ टी आय चे पुढे काय?

मुंबईमध्ये एफ टी आयची बरेच दिवसांपासून रखडलेली बैठक घेण्यात आली, यावेळी अनुपम खेर देखील या बैठकीला उपस्थित होते. एफ टी आय चे कामकाज सुरू रहावे यासाठी अभिनेता दिग्दर्शक सतीश कौशिक यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीनंतर एफ टी आय मध्ये जी आंदोलने झाली होती ती सर्वांना ज्ञात आहेत त्यामुळे उपाध्यक्ष सतीश कौशिक यांचे स्वागत विद्यार्थी कशाप्रकारे करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, मात्र अनुपम खेर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कोण आहे सतीश कौशिक?

satish kaushik
satish kaushik

सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधून लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता अशा विविध भूमिका पार पाडल्या आहेत. मिस्टर इंडिया, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, अंदाज, स्वर्ग ,धमाल, मासूम अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे तेरे नाम, मिलेंगे मिलेंगे, रूप की रानी चोरों का राजा, हमारा दिल आपके पास है अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही सतीश कौशिक यांनी केले आहे.

%d bloggers like this: