मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून देशभरात ‘मै भी चौकीदार’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत भाजप नेत्यांनी मोठा सहभाग नोंदवला असून सोशल मीडियावरील आपल्या नावाआधी अनेकांनी चौकीदार असं लिहिलेले आहे. परंतु, एनडीएमधील मित्र पक्षांनी या मोहिमेपासून अंतर ठेवले आहे.

आपण चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्धव यांनी आपण काँग्रेसमुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे म्हटले आहे.

%d bloggers like this: