देशात रेल्वे अपघातात मागील तीन वर्षात गेले तब्बल 50 हजार जणांचे जीव; परंतू याला रेल्वे जबाबदार नाही- रेल्वे

अमृतसर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातनंतर आता रेल्वेकडून एक अहवाल जाहीर करण्यात आला आहे, त्यात 3 वर्षात रेल्वे अपघातात तब्बल 50 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे समोर आले आहे. रेल्वेने ही आकडेवारी 2015 ते 2017 या काळात झालेल्या अपघाताची दिली आहे.

अमृतसर येथे 19 ऑक्टोबरला झालेल्या अपघातात तब्बल 61 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. हे लोक रेल्वेच्या रुळावर उभे होते. त्यावेळी आलेल्या भरधाव रेल्वेने त्यांना उडवले. परंतु त्यानंतर रेल्वेच्या या अपघातचे प्रमाण कसे रोखता येईल असा प्रश्न उपस्थित झाला.

23 ऑक्टोबरला या संबंधित रेल्वेची एक बैठक पार पडली त्यावेळी 21 राज्याचे जेआरपी (गवर्नमेंट रेल्वे पोलीस) उपस्थित होते. जेआरपी कडून रेल्वेचे नियम आणि कायदे याचे व्यवस्थापन केले जाते.

जेआरपीकडून या बैठकीत सल्ला देण्यात आला आहे की, रेल्वे रूळच्या कडेला असलेल्या गर्दीच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षेअंतर्गत सुरक्षा तट किंवा भिंती उभारण्यात याव्यात.

रेल्वे झोननुसार अपघातांची आकडेवारी – 

रेल्वेने काढलेल्या आकडेवारी नुसार मागील 3 वर्षात रेल्वे अपघातात 49 हजार 790 लोकांचा जीव गेला आहे. ही आकडेवारी रेल्वे झोन नुसार देण्यात आली असून यात सर्वात जास्त अपघात उत्तर रेल्वे झोनमध्ये झाले आहेत.

  • उत्तर रेल्वे झोन – 7 हजार 908
  • दक्षिण रेल्वे झोन – 6 हजार 149
  • पूर्व रेल्वे झोन – 5 हजार 670

‘ट्रेसपासर’ म्हणजे नक्की काय?

परंतू झालेल्या या अपघातांची जबाबदारी रेल्वेने नाकारली आहे. रेल्वे अशा व्यक्तीच्या झालेल्या अपघातांची नोंद ट्रेसपसार म्हणून करते. ‘ट्रेसपासर’ म्हणजे अशा व्यक्ती ज्या रेल्वे धावत असलेल्या भागात अतिक्रमण करतात किंवा धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात.

या बैठकीत सहभागी झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला संगितले की, अमृतसर येथे झालेल्या अपघातानंतर आम्ही रेल्वे मंत्रालयाला सल्ला देणार आहोत की, गर्दीच्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या कडेला  प्रतिबंधक भिंत घालण्यात यावी, जिथे रेल्वे रूळच्या कडेला लोकवस्ती आहे तिथे प्रतिबंधक भिंत बांधणे गरजेचे आहे.

‘ट्रेसपसार’ असलेल्या लोकांसाठी दंड म्हणून रेल्वे कलम 147 नुसार अतिक्रमण हा गुन्हा असून त्या अंतर्गत 6 महिन्याची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा आहे.

या वर्षी मागील महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यत रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वेमध्ये घुसखोरी करणार्‍या 1 लाख 20 हजार 923 जणांना गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेने 147 कलमानुसार या लोकांकडून 2.94 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

मागील वर्षी 2017 ला आरपीएफ कडून 1 लाख 75 हजार 996 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यात 4.35 कोटी रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.


हे ही वाचा – 

विराट कोहलीला GOAT म्हणल्यामुळे बीसीसीआय ट्रोल… काय आहे GOAT ?

भारतावर सागरीमार्गाने दहशतवादी हल्ला करण्याचा कट, गुप्तचर यंत्रणेचा सावधानतेचा इशारा


 

%d bloggers like this: