IND V WI 1st T20 : भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेस्ट इंडिजचा पराभव

कोलकाता :

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेला आज पासून सुरुवात झाली असून कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 5 गडी राखून पराभव केला.

भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Content Middle Property

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये यापूर्वी एकूण आठ टी ट्वेंटी सामने खेळले होते त्यामध्ये पाच सामने वेस्टइंडीजने तर दोन सामने भारताने जिंकले होते.

टी ट्वेंटी चे बादशहा अशी ओळख असणारा वेस्ट इंडिजचा संघ भारताला कडवे आव्हान देणार असे वाटत होते. मात्र भारतीय गोलंदाजांपुढे वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाचा शिरकाव लागला नाही.

वेस्टइंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 108 धावा केल्या. वेस्टइंडीजच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही.

वेस्टइंडीज कडून पदार्पण करणारा फबियन अलेनने सर्वाधिक 20 चेंडूत 27 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांचा थोडाफार संघर्ष केला.

भारताकडून चायनामन कुलदीप यादव ने 4 षटकात 13 धावा देत 3 गडी बाद करत वेस्टइंडीज फलंदाजीचे कंबरडे मोडले. जसप्रित बुमराह,खलील अहमद,उमेश यादव,कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली.

भारताकडून टी ट्वेंटीत खलील अहमद आणि कृणाल पांड्या या दोन खेळाडूंनी पदार्पणात चांगली कामगिरी केली.

खलील अहमदने 4 षटकात 16 धावांत 1 तर पांड्याने 15 धावांत 1 गडी बाद केला.

विराटच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

105 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच निराशजनक झाली.
भारताचे आघाडीचे चार फलंदाज फक्त 45 धावा फलकावर लागल्या असताना तंबूत परतले होते.

मनीष पांडे आणि विकेट किपर दिनेश कार्तिक या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 38 धावांची उपयुक्त भागीदारी करत भारताला सामन्यात पकड मिळवून दिली.

दिनेश कार्तिक ने एका बाजूने संयमी खेळ करत नाबाद 34 चेंडूत 31 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मनीष पांडे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कृणाल पांड्या ने आपला जलवा दाखवत 9 चेंडूत
नाबाद 21 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन खणखणीत चौकार लगावले.

वेस्टइंडीज संघाकडून जलदगती थोमसने आपल्या 4 षटकात 21धावा देत भारताच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. ब्राथवेटनेही 4 षटकात 11 धावा देत 2 बळी टिपले.

Paint Ad
%d bloggers like this: