IND V WI 4th ODI : रो’हिट’, रायडू यांच्या झुंजार खेळी नंतर वेस्टइंडीजचे भारताच्या गोलंदाजासमोर लोटांगण

रोहित शर्मा,रायडूच्या शतकानंतर तिन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडीज संघाला 153 धावांत गुंडाळत 224 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत सलामीवीररांनी 77 धावांची सलामी दिली.

सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला.
सलग तीन सामन्यात शतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली( 16) आज आपला जलवा दाखवण्यास अपयशी ठरला.

Content Middle Property

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी साठी आलेला अंबाती रायडू आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत 27.1 षटकामध्ये 211 धावांची भागीदारी केली.

‘रो’ हिट शर्माने 137 चेंडूत 160 धावांची झुंजार खेळी करत आपल्या कारकिर्दीतले एकविसावे शतक झळकावले. या खेळीत रोहित शर्माने 20 चौकार तर चार षटकार खेचले.

रोहित शर्माकडे आज चौथे द्विशतक साजरे करण्याची संधी होती. मात्र नर्सच्या गोलंदाजीवर खराब फटका मारताना तो बाद झाला.

अंबाती रायडूनेही आपला झंजावात दाखवत अवघ्या 81 चेंडूत 100 धावांची खेळी केली. यात आठ चौकार तर चार षटकारचा सहभाग आहे.

टी ट्वेंटी मध्ये डच्चू मिळालेल्या महेंद्रसिंग धोनीला फटकेबाजी करण्याची चांगली संधी होती. मात्र तो अपयशी ठरला.

शेवटच्या षटकांमध्ये केदार जाधवने थोडीफार फटकेबाजी केल्यामुळे भारताला 377 धावांपर्यंत मजल मारता आली. केदार जाधवने 7 चेंडूत 3 चौकारच्या साह्याने 16 धावा केल्या.

378 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या वेस्टइंडीज संघाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली.

वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी साठी आलेला शाय होप दुर्दैवाने धावबाद झाला. ‌

मागील तीन्ही सामन्यात आपला झंजावात दाखवणारा शाय होप धावबाद होताच वेस्टइंडीज फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर लोटांगण घातले.

कर्णधार जेसन होल्डर वगळता वेस्टइंडीजच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. वेस्टइंडीज चा संपूर्ण संघ 153 धावांत गारद झाला.

कर्णधार जेसन होल्डर ने एकाकी झुंज देत नाबाद 54 धावांची खेळी केली.

भारतीय संघाकडून खलील अहमदने पाच षटकात 13 धावा देत आघाडीचे तीन फलंदाज बाद केले.
कुलदीप यादवने 42 धावांत 3 गडी बाद करत त्याला चांगली साथ.

या विजयाबरोबरच भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 आघाडी घेतली. या मालिकेतला शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानावर 1:30 वाजता खेळविण्यात येणार आहे.

Paint Ad
%d bloggers like this: