भारत अर्थव्यवस्थेत फ्रान्सला खरचं मागे टाकू शकतो? की हा ही एक नेहमी सारखा प्रोपगंडा आहे ?

भारतात लागू झालेल्या नोटाबंदी नंतर जीएसटी नंतर भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी किंवा वाढ झाली आणि भारताच्या अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत 6 व्या स्थानावर उडी घेतली असे जागतिक बँकेकडून आलेल्या अहवालानंतर संगितले जात आहे. परंतु हे खरच शक्य आहे.

लोकांची जीवनमान सुधारले आहे की नाही यासाठी प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न याचा आधार घेतला जातो. फ्रान्समधील प्रति व्यक्तीचे वर्षाचे दरडोई उत्पन्न 38,477 डॉलर एवढे आहे. त्या मनाने भारतातील प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न हे फक्त 1,940 डॉलर एवढे आहे. याचाच अर्थ भारतातील सामान्य माणूस फ्रान्समधील व्यक्तीपेक्षा 20 टक्क्यापेक्षा अधिक गरीब आहे.

जागतिक बँकेच्या आलेल्या अहवालानुसार जर फ्रान्समधील 6 कोटी लोकसंख्येची तुलना भारतातील 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या लोकसंख्येशी केली तर आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा नक्कीच मोठी अर्थ व्यवस्था ठरू. याचा अर्थ असा नाही की भारतातील व्यक्तींचे जीवनमान सुधारले आहे. आणि भारतातील गरिबी कमी झाली आहे.

भारत जगात आता सर्वात जास्त गरीब लोकसंख्या असलेला देश राहिला नाही हे पूर्णता सत्य आहे. कारण भारतानंतर सर्वात शेवटच्या क्रमांकावरील देश हा नायजेरिया आहे. वर्ल्ड पॉवर्टी क्लॉक अँड ब्रुकिंग्स च्या अहवालानुसार भारतात गरिबांची संख्या ही 7 कोटी आहे, तर यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर असलेल्या नायजेरिया सारख्या अत्यंत विकसनशील देशात गरिबांची लोकसंख्या 8.7 कोटी आहे. म्हणजे भारत गरिबांची लोकसंख्या जास्त असलेल्या स्थानावर शेवटून दुसर्‍या स्थानावर आहे.

याचाच अर्थ भारत; फ्रान्स च्या अर्थव्यवस्थेपेक्षा फक्त आकड्याने पुढे गेला आहे. परंतू जनजीवनमान काही उचवले नाही. कारण कोणताही देश जेव्हा पुढे जातो तेव्हा तेथील लोकांचे जीवनमानाचा दर्जा सुधारलेला असतो, न की फक्त कागदावरील आकडेवारी.

प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेची तुलना करताना त्या देशाच्या चालनाची आणि महागाईची स्थिती काय आहे हे देखील पहिले पाहिजे. जर फ्रान्सच्या चलनाची भारतीय चलनाशी तुलना केली तर भारतीय रुपयाची किंमत ही सतत कमी जास्त होत असते. तर फ्रान्समधील चालनाची सतत घसरण आणि वाढ होत नाही. फ्रान्समधील व्याजदर भारताच्या तुलनेत बरेच कमी आहेत तर महागाई देखील नियंत्रणात आहे.

यामुळे फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकले एवढेच बघून चालणार नाही तर त्यामागील इतर आकडेवारींचाही विचार तितकाच महत्वपूर्ण आहे.

%d bloggers like this: