‘कॉमेडी’ चा बादशाह कपिल शर्मा चढणार बोहल्यावर, ठरला मुहूर्त

 

अल्पावधीतच यशाची परिसीमा ओलांडून घराघरात पोहोचणारा ‘कॉमेडी’ चा बादशाह कपिल शर्मा येत्या 12 डिसेंबरला बोहल्यावर चढणार असून येत्या 14 तारखेला रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.

कपिल शर्मा हा छोट्या पडद्यापासून अनेक काळ लांब राहिला असून कपिलच्या लग्नाची बातमी ही त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करणारी असून लग्नापूर्वी कपिल त्याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचंही बोललं जातं आहे.

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माचा सहकलाकार सुनील ग्रोवर यांच्याशी झालेल्या भांडणामुळे सुनील ग्रोवर बरोबर अली असगर, सुगंधा मिश्रा यांनी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या रियालिटी ‘शो’ ला रामराम केला होता.

सुनील ग्रोवर, सुगंधा मिश्रा, अली असगर हे अफलातून कॉमेडी करणार्या कलाकारांनी ‘शो’ सोडल्यानंतर प्रेक्षकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि काही काळातच हा ‘शो’ बंद पडला.

अल्पावधीतच यशाची परिेसीमा ओलांडून हा कार्यक्रम भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचला होता. कलाकारांना या कार्यक्रमाने वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. विशेष करून कपिल शर्माला. कपिल शर्माचे चाहते हे बॉलिवूडमधील अनेक स्टार मंडळी होती.

मात्र सहकलाकारांसोबत वाद झाल्याने शो बंद पडला. त्याबरोबर कपिलची लोकप्रियताही कमी झाली.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत असून अनुष्का,सोनम कपूर, यांचा विवाह झाला असून प्रियंका चोप्रा, दीपिका-रणवीरही विवाह बंधनात अडकणार आहेत.

तेव्हा सगळेच लग्न करत आहेत मग मी का मागे राहू?’ असं म्हणत कपिलनं त्याच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

डिसेंबर महिन्यात कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा आपली प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे हे जवळपास नक्की झालं आहे.

या दोघांचा विवाहसोहळा जालंधरमध्ये मोठ्या थाटामाटात  पार पडणार आहे. गिन्नी मुळची जालंधरची आहे म्हणून तिथेच हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

12 डिसेंबरला कपिल गिन्नीचा विवाहसोहळा पार पडणार असून आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत कपिलनं लग्नाची तारिख जाहीर केली आहे.

कपिल आणि गिन्नीचं लग्न हे बिग फॅट पंजाबी वेडिंग असणार हे नक्की. चार दिवस हा विवाहसोहळा पार पडणार आहे याची तयारीही सुरू झाली असल्याची माहिती कपिलच्या मित्रानं दिली आहे.

कपिल आपला विवाह खूप साध्या पद्धतीने करणार होता. मात्र कपिलची आई आणि गिन्नीच्या कुटुंबियांनी थाटामाटात विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे कपिल थाटामाटात लग्न करायला तयार झाला.

कपिल शर्माने गेल्यावर्षी मार्च महिन्यात गिन्नीसोबतच आपला फोटो शेअर करत आपल्या नात्याची कबुली दिली होती.

%d bloggers like this: