जाणून घ्या राममंदिर, शिवस्मारक, आरक्षण याबाबत काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

आमच्या सरकारने केलेले खूप सारे प्रकल्प कौतुकास्पद आहेत परंतू मी जलयुक्त शिवारला सगळ्यात जास्त मार्क देईल. यामध्ये गावच्या गाव सकाळी उठून श्रमदान करतात असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केले.

योजनांच्या यशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 7000 पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या, साडेपाच लाख घरे पंतप्रधान आवास योजनेतून बंडण्यात आली असून आणखी सहा लाख घरे बांधली जाणार आहेत. ग्रामीण भागात तीस हजार कोटींचे रस्ते बांधतोय, सात लाख शौचालये बांधली आहेत, देशात सर्वात जास्त स्टार्टअपचे काम महाराष्ट्रात झाले आहे.

अठराव्या, अकराव्या अशा क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

शहर असो की गाव प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामे आमच्या सरकारने केली असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

या विषयांबद्दल मुख्यमंत्र्यांचं मत काय – 

  • वेगळ्या विदर्भाबद्दल –

  • वेगळा विदर्भ किंवा छोटी राज्य ही भाजपची राजकीय विचारधारा आहे. मात्र याचे अधिकार केंद्र सरकारकडे असतात त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार निर्णय देईल.
  • नक्षलवादाच्या मुद्यावर विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही डावे-उजवे, मधले असे काही पण म्हणा पण देशविघातक कार्य करणार तर कार्यवाही होणारच.जे लोक दोन समाज एकमेकांशी भांडावे यासाठीचे प्रयत्न करतात त्यांच्यावर कारवाई करणारच.
  • आरक्षणाबाबत – 

  • मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आरक्षणाचा अहवाल 15 नोव्हेंबरला आल्यानंतर काय ते सांगता येईल मात्र एखादी गोष्ट कायद्याने नियमात होत असताना श्रेयवादाकरिता लोकांनी आंदोलन करून राजकारण करू नये.
  • धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकतो मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्याचे हक्क केंद्र सरकारकडे आहेत.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल –

  • स्मारकाची जागा बदलण्याचा विषयच नाही. अपघात दुर्दैवी होता, मात्र दुर्घटनेमुळे स्मारकाची जागा बदलणे योग्य नाही. सकारात्मक सूचनांचे आम्ही नक्कीच पालन करू.
  • राम मंदिराबाबत –

  • सगळ्यांची अपेक्षा आहे की राम मंदिर व्हावे. आम्हीही तसेच प्रयत्न करतोय, शिवसेना यासाठी पुढाकार घेणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांची तपशीलवार माहिती दिली तसेच पुढील कामे अशीच व्यवस्थित होतील असा  विश्वास व्यक्त केला.


हे ही वाचा –

बांग्लादेशच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान झिया यांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

188 प्रवाशांना घेऊन जाणार्‍या अपघातग्रस्त विमानाचा पायलट ‘भारतीय’

‘मेक इन इंडिया’ एक रोजगार घोटाळा – सामना


 

%d bloggers like this: