188 प्रवाशी घेऊन जाणारे इंडोनेशियाचे विमान कोसळले; जावा समुद्रात विमानाचा शोध सुरू

जकार्ताहून 188 प्रवाश्यांना घेऊन जाणारे इंडोंनेशियाचे लायन एअरवेजचे प्रवासी विमान अचानक कोसळले. 13 मिनिटांनंतर उड्डाण केलेल्या या विमानाशी संपर्क तुटला. विमानाशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने अधिकार्‍यांकडून अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर शोध पथकाकडून घेण्यात आलेल्या शोधत या विमानाचे अवशेष जावा समुद्र किनार्‍याजवळ सापडले आहे.

हे विमान जकार्ताहून पिनांगला जात होते. उड्डाण करताच हे विमान काही मिनिटांनी कोसळल्याचे शोध पथकाकडून सांगण्यात आले आहे. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार शोध पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार विमान कोसळल्याचे वृत्त आहे.

पेर्टीमिना या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अवशेष जावा समुद्रात आणि किनार्‍याच्या आसपास दिसून येत आहेत.

इंडोनेशियाच्या सरकारने लायन एअर जेटी 610 कोसळलेल्या विमानात क्रू मेंबरसह 189 प्रवासी होते, असे सांगितले आहे. लायन एअरच्या प्रवक्ते युसुफ लतीफ यांनी टेक्स मेसेज करून या अपघाताची माहिती दिली आहे.

द एजला मिळालेली अपघातानंतरची छायाचित्र ज्यात विमानाचे काही अवशेष आणि प्रवाश्यांचे साहित्य आहे –

%d bloggers like this: