‘मेक इन इंडिया’ एक रोजगार घोटाळा – सामना

25 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘मेक इन इंडिया’ची सुरुवात केली. देशातील आणि विदेशातील उद्योग जगताचा फायदा भारताला व्हावा हा मूळ उद्देश मेक इन इंडियाचा होता.

नोटाबंदीनंतर एका वर्षातच 30-35 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. शिपायांच्या 5 जागांसाठी 27 हजार उमेदवार रांगेत उभे राहतात हे चित्र काय सांगते? मेक इन इंडियाचे पंख झडून गेले की काय? हा तर एक रोजगार घोटाळा आहे! अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून रोखठोक पद्धतीने प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणलय नेमकं सामनातील रोखठोक’ मध्ये –

  • शेती हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय होता. शेती क्षेत्राचे साफ पानिपत झाले आहे.
  • गोवंश हत्येचा अतिरेक झाल्याने शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.
  • रोजगार निर्मितीबाबत जे मोठमोठे आकडे दिले जात आहेत त्यात काही तरी घोटाळा आहे.
  • उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील रोजगारांची उदाहरणे देत कोणत्या जागेसाठी किती तरुणांनी अर्ज केल्याच्या माहितीची आकडेवारी देऊन यांच्या ‘जॉब मार्केट’मध्ये काहीतरी गडबड असल्याचे म्हटले आहे.
  • उद्योगधंद्यासाठी नव्या राजवटीत पोषक वातावरण राहिले नाही.
  • नोटाबंदीसारखे निर्णय लादले गेले. त्यामुळे छोटे उद्योग, व्यापार नष्ट झाला.
  • मुंबईत मराठी शिकवणारे शिक्षक बेकार झाले.

आज शिपायाच्या पाच जागांसाठी पन्नास हजार अर्ज येतात. तेव्हा डॉलर्सच्या तुलनेत रुपया मरण का पावला याचे गणित उलगडते. असे रोखठोक मत सामनातून मांडण्यात आले आहे.


हे ही वाचा – 

Asian Hockey Champion :- मेघराजाच्या व्यत्ययामुळे प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानला ‘संयुक्त जेतेपद’

मराठा समाज आरक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात; पक्षस्थापनेनंतर महाराष्ट्रातून लढवणार इतक्या जागा

188 प्रवाशी घेऊन जाणारे इंडोनेशियाचे विमान कोसळले; जावा समुद्रात विमानाचा शोध सुरू


 

%d bloggers like this: