मराठा समाज आरक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात; पक्षस्थापनेनंतर महाराष्ट्रातून लढवणार इतक्या जागा

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्रात मराठा समाजाकडून केली जात होती. राज्य सरकारने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण ठोस पावले उचलली जात नसल्याने स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या निर्णय मराठा आंदोलन संघर्ष समितीकडून घेण्यात आला आहे.
याआधी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही ठोस हालचाली दिसून न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर शांततेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आता आरक्षणाची लढाई थेट निवडणुकीच्या माध्यमातून लढणार असल्याचे मराठा आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ते म्हणाले.
आतापर्यंत मराठा समाजाला आश्वासनांच्या गाजरा व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत कारण न्याय मिळवण्यासाठी स्वतःच शस्त्र हाती घेतले पाहिजे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पक्षाची अधिकृत घोषणा येत्या आठ नोव्हेंबरला पुण्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरात पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे, आरक्षणासाठी लढणारा हा पक्ष महाराष्ट्रात 5 लोकसभेच्या तर 50 विधानसभेच्या जागा लढवणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे या विभागात पक्ष स्थापना निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  त्याचप्रमाणे नवीन पक्षाची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली.
आघाडी सरकारकडूनही आम्हाला आरक्षण मिळाले नाही आणि आत्ताच्या युती सरकारचेही काही खरे वाटत नाही. त्यामुळे दबावगट निर्माण करण्यासाठी पक्षाची स्थापना करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा – 

188 प्रवाशी घेऊन जाणारे इंडोनेशियाचे विमान कोसळले; जावा समुद्रात विमानाचा शोध सुरू

Asian Hockey Champion :- मेघराजाच्या व्यत्ययामुळे प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तानला ‘संयुक्त जेतेपद’


 

%d bloggers like this: