#Metoo अमेरिकास्थित महिला पत्रकाराचा एम जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

एम जे अकबर आणि त्यांच्या पत्नीने फेटाळला आरोप

तब्बल 19 महिलांनी केलेल्या लैंगिक अत्याचारच्या आरोपांनंतर भाजप केंद्रीय मंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेतील एका महिला पत्रकाराने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टमधील एक लेखात या महिला पत्रकाराने आपल्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला आहे.

सध्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करणार्‍या पत्रकार पल्लवी गोगोई या 23 वर्षांपूर्वी एशियन एज या      वृत्तपत्रामध्ये काम करत होत्या. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील फार माहिती नव्हती. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांच्यावर संपादक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पल्लवी यांच्या लेखात सांगण्यात आली आहे की, त्यांच्या बरोबर जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या 23 वर्षाच्या होत्या. संपादकीय पान दाखवण्याच्या हेतूने त्या अकबर यांच्या केबिनमध्ये गेल्या होत्या. परंतू  त्यावेळी अकबर यांनी त्यांच्याशी गैरवर्तणूक केल्याने त्या थेट त्यांच्या केबिनच्या बाहेर आल्या. त्यांनी हा प्रकार त्यांच्या मैत्रिणीला सांगितला.

हा एक प्रकार नसून त्यांच्या बरोबर असा प्रसंग पुन्हा एकदा मुंबईत घडला. त्यावेळी देखील त्यांनी अकबर यांना विरोध केला. दिल्लीत आल्यावर त्यांना पुन्हा विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी अकबर यांच्याकडून देण्यात आली होती.

असाच प्रकार जयपूरमध्ये देखील झाल्याचे त्यांनी संगितले, त्यावेळी त्याचे लैंगिक शोषण झाल्याचे त्यांनी संगितले. परंतू आपण पोलिसात तक्रार केली नाही असे देखील त्यांनी लेखात म्हणले आहे.

परंतू एम जे अकबर यांच्या पत्नीने #MeToo मोहिमेत आणि पल्लवी गोगोई यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ‘एम जे अकबर आणि पल्लवी गोगोई यांच्यात संबंध होते, त्यामुळे आमच्या कुटुंबात देखील समस्या उद्भवत होत्या. परंतू पल्लवी गोगोई यांचे लैंगिक शोषण झाले नसण्याचे त्यांनी संगितले.’

तर एम जे अकबर यांनी मात्र पल्लवी गोगोई आणि माझ्यात एकमेकांना मान्य असणारे संबंध होते, परंतू आमच्या नात्याचा शेवट चांगला झाला नाही असे संगितले आहे.

%d bloggers like this: