#MeToo प्रकरणी पुण्यातील सिंम्बायोसिसमधील दोन प्राध्यापक निलंबित

विद्यार्थिनींकडून करण्यात आले होते लैंगिक शोषणाचे आरोप

पुणे- #MeToo मोहिमेअंतर्गत पुण्यातील विमाननगर येथील सिंम्बायोसिस महाविद्यालयातील तरुणींनी आपल्याबरोबर घडलेल्या महाविद्यालयातील प्रकार सोशल मीडियावर मांडण्यास सुरुवात केली होती. त्यांनी महाविद्यालयातील काही आजी-माजी विद्यार्थ्यांवर आणि काही प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर महाविद्यालयाने कारवाई करत सेंटर फॉर मिडीया अ‍ॅन्ड कम्युनिकेशन (एससीएमसी) विभागातील दोघा प्राध्यापकांना निलंबित केले आहे.

दोन प्राध्यापक निलंबित – 

सुहास घाटगे आणि विजय शेलार या प्राध्यापकांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी संचालक अनुपम सिध्दार्थ यांना देखील सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. सोशल मीडियावरून सिंम्बायोसिसच्या काही विद्यार्थींनीनी महाविद्यालयातील प्राध्यापकांवर आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचे संगितले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थिनी सोशल मीडियावर व्यक्त झाल्या होत्या.

एका माजी विद्यार्थिनीने तिला इंटर्नशिप दरम्यान आलेल्या अनुभवाची तक्रार महाविद्यालयाच्या इंटर्नशिप समन्वयकाकडे केली होती. त्यावेळी तिची इंटर्नशिप थांबवण्यात आलेचे तिने सोशल मीडियावर मांडले. महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार करून देखील काहीच कारवाई करण्यात आली नाही असे देखील तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

याची दाखल घेत सिंम्बायोसिस महाविद्यालयाने सोशल मीडियावर ओपन लेटर पोस्ट केले होते. त्यात झालेल्या प्रकाराची महाविद्यालय प्रशासनाकडून माफी मागण्यात आली होती आणि विद्यार्थिनींना आवाहन करण्यात आले होते की त्यांनी आपली तक्रार महाविद्यालयाच्या तक्रार निवारण समितीकडे करावी, जेणे करून कारवाई तपास करून कारवाई करण्यात येईल.

इंटर्नशीपच्या ठिकाणी आलेल्या वाईट अनुभवांची, आम्हाला शिकवणार्‍या प्राध्यापकांनी केलेल्या गैरवर्तणुकीची दखल महाविद्यालयाकडून गांभीर्याने घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थीनींकडून करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनाने कारवाई करत दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे.


हे ही वाचा –

#METOO चे वारे पोहचले पुण्यातील महाविद्यालयात; सिम्बायोसिसमधील विद्यार्थिनीचा प्राध्यापक, माजी विद्यार्थ्यांवर आरोप

मुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षे नाहीच; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

हिटलरशाही आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे, वंचित समाजाने वेळीच एकत्र यावे – प्रकाश आंबेडकर


 

%d bloggers like this: