मंदिर मस्जिद की लढाई राम को फिर वनवास देगी…; ‘मोहल्ला अस्सी’चा हटके ट्रेलर रिलीज

सनी देओल तसा आपल्या ॲक्शन अभिनयासाठी ओळखला जातो मात्र नुकत्याच आलेल्या ‘मोहल्ला अस्सी’ च्या ट्रेलरमध्ये सनी एका ब्राह्मण पुजाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित मोहल्ला अस्सी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला.

मोहल्ला अस्सी हे नाव एका विशिष्ट ठिकाणचे आहे असे वाटते, ट्रेलरमध्ये वाराणसी सारखी ठिकाणे स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र सोशल मिडियावर चर्चा आहे ती या चित्रपटातील संवादाची.

चित्रपटात राम मंदिर आणि त्याच्या निर्मितीचा काहीतरी संबंध असल्याचे ट्रेलरवरून जाणवते. ‘मंदिर मस्जिद कि लढाई राम को फिर वनवास होगा’ त्याच प्रमाणे ‘भो****के  यहा गाली नही राष्ट्रभाषा है’ अशा प्रकारचे संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

ट्रेलर पाहून चित्रपटात धार्मिकता आणि त्याच्या अवतीभौवतीच्या गोष्टींवर विनोदी शैलीत भाष्य केल्याचे दिसून येत आहे.

सनी देओल बरोबर या सिनेमात रवी किशन, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, राजेंद्र गुप्ता, साक्षी तन्वर अशा कलाकारांची फौज दिसणार आहे. येत्या 16 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Paint Ad
%d bloggers like this: