आ.. रा.. रा खतरनाक; ‘मुळशी पॅटर्न’चा टिझर रिलीज

आरा रा रारा… खतरनाक या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेला मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. गुन्हेगारी विश्वाचे चित्र या चित्रपटातून नाट्यमयरित्या पडद्यावर मांडण्यात आले आहे.

चित्रपटातील खतरनाक संवादाची झलक टिझर मधून पहायला मिळते. मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात ओम भुतकर, प्रवीण तरडे, मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये अशी तगडी स्टारकास्ट आहे.

“यमदेव जरी रेड्यावर बसून आला ना,तरी आपण अशा अवतारात उभं राहायचं की रेड्याची पण फाटली पाहिजे” अशा प्रकारची तुफान डायलॉगबाजी टिझरमध्ये दिसून येते.

गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी असल्यामुळे तरुणांमध्ये ‘मुळशी पॅटर्न’चा टिझर चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या 23 नोव्होबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Paint Ad
%d bloggers like this: