PNB Scam :- पळकुट्या नीरव मोदीचा ज्या बँक शाखेत झाला होता घोटाळा त्याच बँकेत पुन्हा नवीन घोटाळा उघड

देशाला आणि पीएनबी बँकेला चुना लावून पळून गेलेल्या नीरव मोदी नंतर आता पीएनबीला परत एकाने चुना लावला आहे. ज्या पीएनबी बँकेच्या शाखेने फरार नीरव मोदीला कर्ज दिले होते, तिची पीएनबीची मुंबईमधील शाखा पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे. कारण याच शाखेला पुन्हा एकदा गंडा घातला गेला आहे. सीबीआयने याच बँकेच्या अज्ञात अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डीएनए ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पीएनबीच्या ब्राडी हाऊस शाखामधून  हा नवा घोटाला समोर आला आहे. त्यानुसार या शाखेत 9.48 कोटीचा घोटाळा झाला आहे. सीबीआयने याविरोधात व्हीजन मशीन प्रायवेट लिमिटेड, वांद्रे (व्हीएमपीएल) या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे, यात या कंपनीचे डायरेक्टर मनीष सोनी,  कुलदीप वर्मा आणि कर्ज देण्यासाठी असलेल्या 2 जामीनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बँकेच्या अधिकारांच्या देखील समावेश आहे.

पीएनबी बँक शाखेचे सहायक महाप्रबंधक दिनेश भारद्वाज यांनी तक्रार दाखल केली होती, यात सांगण्यात आले आहे की, व्हीएमपीएल या कंपनीला बँक ने जे कर्ज दिले होते ते फेडण्यात कंपनी अयशस्वी ठरली, 2015 नंतर बँकेला नॉन-परफॉर्मिंग ऍसेट ( जे कर्ज फेडू शकत नाही ) या प्रकारात वर्गीकृत करण्यात आले. तक्रारीनुसार व्हीएमपीएल या कंपनीने कर्ज घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आणि संपत्ती संबंधित खोट्या कागदपत्रांचा वापर केला होता.  

बँकेने कंपनीला कंपनी ने घेतलेल्या वैयक्तिक गॅरंटीवर कर्ज मंजूर केले होते. त्यासाठी बँकेने 2013 मध्ये 4.80 कोटीचे कार्यशील भांडवल दिले होते आणि 5 कोटीचे मुदत कर्ज मंजूर केले होते. 

कंपनी आर्थिक शिस्त पळण्यात अपयशी ठरले, स्टॉकची आवश्यक पातळी राखण्यासाठी ठराविक अंतरानंतर नियमित स्टॉक स्टेटमेंट बँकेला सादर करणे अपेक्षित असते. परंतू आरोपी नियमित स्टॉक स्टेटमेंट बँकेला सादर करण्यात अपयशी ठरले.

हे ही वाचा- 

Asian Games 2018 : विनेश फोगाटने रचला इतिहास, केली ‘सुवर्ण’मय कामगिरी

देशासाठी ‘एशियन गेम’मध्ये खेळणार्‍या या जलतरणपटूने अशा स्थितीत केलाय रेकॉर्ड, ज्यावेळी कुटुंब फसलंय केरळच्या पुरात

 

%d bloggers like this: