पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला ‘किंग कोहलीचा’ विक्रम

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझमने 58 चेंडूत 79 धावांची खेळी केली. या खेळी बरोबरच सर्वात जलद 1 हजार धावा करत विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला.

दुबईत झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाचा 47 धावांनी पराभव करत 3 टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश दिला.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामधील तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यापूर्वी बाबर आझमला एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज होती.

विराट कोहलीने 1हजार धावा पूर्ण करण्यासाठी 27 सामने खेळले होते. तर बाबर आझमने 26 सामन्यात हा पराक्रम करत विराट कोहली चा विक्रम मोडीत काढला.

विराट कोहलीच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये 48.88 च्या सरासरीने 2 हजार 102 धावा आहेत तर बाबर आझमच्या 54.26 च्या सरासरीने 1031 धावा झाल्या असून सर्वात जलद 1000 धावा करणारा बाबर आझम जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.

%d bloggers like this: