सध्या सर्वत्र पेड न्यूज, फेक न्यूज आणि मीडियामधून प्रोपगंडा पसरवण्याचे प्रमाण वाढत असताना; वाचकांनादेखील ‘मीडिया हाऊसेस’चा प्रामाणिकपणा ढासळत चालला असल्याचे लक्षात आले आहे. संपादकीय लिखाण गुंतवणूकदारांच्या हिताचा फायदा लक्षात घेऊन लिहिले जातात आणि बातम्यादेखील समूह किंवा मालकांच्या हिताचा विचार करून छापल्या/दाखवल्या जातात.
‘द पोस्ट’ला याची जाणीव आहे की, स्वतंत्र पत्रकारिता लोकशाहीचा मुख्य आधार आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि यशस्वी ठरवण्यासाठी मिडियाने नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे व नेहमी सत्यच दाखवले पाहिजे.
‘द पोस्ट’चा हा विश्वास आहे की, मिडियाचे काम हे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणे आहे ना की सरकारच्या कामाची स्तुती करणे आहे. आम्ही सर्व प्रकारच्या विचारसरणीचा आदर करतो पण असे असले तरीही आम्ही कोणत्याही विचारसरणीशी बांधील नाही.
पॉलिटिक्स आणि इकॉनॉमी या विषयांबरोबरच आम्ही वाचकांच्या आवडीचे स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट या विषयांवरदेखील लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्ही ‘लोकल टू ग्लोबल’ अशा सर्वच स्तरावरच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रत्येक बातमी जनतेपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्या घटनेची सत्यता तपासूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल. घडलेल्या घटनेच्या बातमीबरोबरच त्या घटनेचे सर्व पैलू वाचकांपर्यंत पोहोचवले जातील. तसेच त्या घटनेसंदर्भात ‘मत’ व ‘विरोधी मत’ देखील वाचकांपर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करू.
‘द पोस्ट’ ची लेखनाची शैली हटके आहे, अगदी तुमच्या आमच्या भाषेसारखी; बातमी सुद्धा एखादी गोष्ट सांगावी या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचविली जाईल.
आज प्रत्येकाच्या हातात आणि खिश्यात स्मार्ट फोन आहे, त्याची संख्यादेखील वाढत चालली आहे आणि याच कारणाने आम्ही तुम्हाला तुमच्या एका क्लिकवर ‘सत्य पत्रकारिता’ प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत.
‘द पोस्ट’चा एकतर्फी संवादावर नाही तर दुतर्फी संवादावर विश्वास आहे . त्यामुळे ‘द पोस्ट’ विरोधी मतांचा देखील आदर करतो. म्हणून आम्ही वाचकांना देखील त्यांची मते/विचार आमच्यापर्यंत पोहचवण्याची आणि आमच्यासाठी ‘लिहिण्याची संधी’ देत आहोत ‘ओपिनियन’मधून.
धन्यवाद.