भारतावर सागरीमार्गाने दहशतवादी हल्ला करण्याचा कट, गुप्तचर यंत्रणेचा सावधानतेचा इशारा

भारतीय तुरुंगातील दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी सागरी मार्गाने येऊन भारतावर दहशतवादी हल्ला करू शकतात असा इशारा खुद देशाच्या गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आल्याचे वृत्त नवभारत टाइम्सने गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार दिले.

भारताच्या सीमारेषेवरून अनेक वेळा घुसखोरांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात अपयश येत असल्याने आता पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआय (इंटर सर्विस इंटेर्लीजन्स) कडून पाकिस्तानी घुसखोरांना समुद्रातून पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय लष्करावर दहशतवादी आयईडी (इम्प्रोवाईज एक्स्प्लोसीव डिवाईस) ब्लॉस्ट करू शकतात अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.

भारतीय तुरुंगात असलेल्या शम्शुल वकारला या दहशतवाद्याला सोडवण्यासाठी पाकिस्तानने योजना आखली आहे. हा दहशतवादी अनंतनाग येथील तुरुंगात कैद आहे, याकारणाने गुप्तचर यंत्रणाना मिळालेल्या सूत्रांच्या आधारे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनुसार क्रीक एरियामध्ये पाकिस्तानी मरीन घुसखोरांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहे. तर इंडियन पोस्ट, कार्गो शिप और ऑइल टँकर्स या ठिकाणी दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे देखील सांगितले आहे.

तसेच कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी भारतीय जवानांवर आणि लष्करी तळांवर आयईडी हल्ले करून शकतात असा इशारा देखील गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे.

2 दिवसांपूर्वी इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना भारतावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि सशस्त्र दलांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट त्यांच्याकडून आखण्यात येत आहे.

100 आत्मघाती हल्लेखोरांनी भारताच्या सशस्त्र दलाविरोधात मोहीम छेडण्याची शपथ घेतली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 19 आणि 20 ऑक्टोबरला दोन कार्यक्रम पार पडले. यावेळी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचा कट आखला आहे. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने हे कार्यक्रम आयोजित केले होते.

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पुलवामा, राजौरी या कश्मीरमधील भागात लष्करी तळावर दहशतवादी हल्ले वाढले आहेत. यात दहशतवाद्यांना कंटास्थान घालण्यात आले तर भारतीय जवान शहीद झाले आहेत.

%d bloggers like this: