शरद पवारांना हवा कुठल्या दिशेला आहे माहित असल्यामुळेच त्यांनी माघार घेतली – नरेंद्र मोदी


लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील सभेत फोडला. प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाना साधला. शरद पवार यांना हवा कुठल्या दिशेला वाहत आहे हे माहित असल्याने माघार घेतली असल्याचे मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळयांच्या आरोपांची उदहारणे दिली.

%d bloggers like this: