OPINION | PM नरेंद्र मोदींनी No Confidence Motion च्या भाषणात या प्रश्नांची उत्तरे दिली असती, तर बरे झाले असते

काल लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्ताव 199 अशा बहुमताने जिंकला. मोदी सरकारच्या बाजूने 325 मते, तर विरोधात 126 मते पडले. मोदी यांनी निश्चितच अविश्वास प्रस्तावात बाजी मारली. पण कालचे त्याचे भाषण हे नेहमीचेच मुद्दे पुढे करत रटाळवाणे झाले हे मान्य करायला हवे. तर राहुल गांधींचे हे भाषण निश्चितच पंतप्रधान मोदीं पेक्षा सरस होते.

शेवटचा गळाभेटीचा क्षण – राहुल गांधीचा हा शाॅट आउट आॅफ द पार्लामेंट होता. आपण जिंकणार नाही हे विरोधी पक्षांना माहित होते; पण या निमित्ताने जे मुद्दे लोकांपर्यंत ‘विकल्या गेलेल्या मिडिया’मुळे पोहचत नव्हते ते मुद्दे या निमित्ताने तरी लोकांपर्यंत पोहचतील हा विरोधी पक्षांचा हेतू. राहुल गांधींनी हे ‘खरे’ मुद्दे ठोसपणे मांडले; पण पंतप्रधान मोदींनी अनेक विषयावर काहीच भाष्य केले नाही.

राहुल गांधींनी काही ‘अस्सल’ मद्दे मांडले असेल तरीही, काही खरे मुद्दे मांडण्यास राहुल गांधी देखील विसरले. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे जय अमित शाह केस आणि पियुष गोयल प्रकरणावर राहुल गांधी काहीच बोलले नाहीत. दुसरा मुद्दा जम्मू- काश्मिरचा. याविषयी देखील राहुल गांधी काहीही बोलले नाहीत.

सुरक्षामंत्री निर्मला सितारमण आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काही प्रश्नाची उत्तरे दिली; पण तिच उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी दिली असती तर निश्चितच तो थेट विरोधी पक्षावर हल्ला झाला असता.

अनेक प्रश्न होते ज्यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलणे गरजेचे होते. उत्तरे देणे गरजेचे होते; पण नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलणे टाळले.

1) माॅब लिचिंग ?

माॅब लिचिंग द्वारे होणाऱ्या हत्यांवर पंतप्रधान मोदी यांनी एकही मुद्दा उपस्थित केला नाही की, सरकार या बाबतीत काय काम करत आहे हे सांगितले नाही.

2) शेती प्रश्न ?

शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा सध्याच्या राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. पण दीड तासांच्या भाषणात पंतप्रधान शेती विषयी काहीच बोलले नाहीत.

3) तरूणांना रोजगार ?

सत्ते येण्याआधी मोदी सरकारने 2 करोड रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. ते किती पूर्ण झाले याविषयी पंतप्रधान काहीच बोलले नाहीत.

4) वाढते पेट्रोल – डिझेल दर ?

2014 साली काॅंग्रेस सरकार पडण्याच्या अनेक कारणांपैकी महत्त्वाचे कारण वाढते पेट्रोल-डिझेलचे दर. यावेळेसही हीच परिस्थिती आहे. पण पंतप्रधान काल या वाढत्या दरावर एकही अक्षर बोलले नाहीत.

5) महिला सुरक्षा ?

महिला सुरक्षेचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. पण पंतप्रधान यावर काहीच बोलले नाहीत.

6) नीरव मोदी आणि विजय माल्या ?

विजय माल्या आणि निरव मोदी यांचे काय झाले ? त्यांना भारतात परत कधी आणणार हे मोदींनी काल स्पष्ट केले असते, तर निश्चितच संपूर्ण भारताला याची माहिती मिळाली असती, पण पंतप्रधान यावर देखील गप्प राहिले.

%d bloggers like this: