Pro Kabbadi 2018 : आजचा सामना पटना पायरेट्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स

पाटणा पायरेट्स संघाचा आजचा सामना बेंगाल वॉरियर्स विरुद्ध असून हा सामना पतलीपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पटना मैदानावर रंगणार आहे.

पटणा पायरेट्स संघानला सलग ४ सामन्यात हार पत्करावी लागली आहे. संघ घरच्या मैदानावर सतत हरत आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणे संघासाठी महत्वाचे आहे. संघाचा कर्णधार व रेडर प्रदीप नरवाल एकटाच रेड गुणांमध्ये पुढे आहे. इतर खेळाडू पाहिजे अशी कामगिरी करत नसल्यामुळे संघाला सतत हार पत्करावी लागली आहे.

बेंगाल वॉरियर्स संघाचा एंटर झोन चॅलेंजेस आठवड्यात शेवटचा सामना जयपूर पिंक पँथर संघाबरोबर होता हा सामना संघाने ३९-२८ गुणांनी जिंकला. संघाचा कर्णधार व डिफेंडर सुरजित सिंगने ५ सामन्यात १७ टॅकल गुण मिळवले आहेत. तर संघातील इतर डिफेंडर व रेडर हि उत्तम कामगिरी करत आहे. संघाला आजचा सामना जिंकून बी झोनमध्ये ३ स्थानावर येण्याची संधी आहे .

बेंगाल वॉरियर्स संघाने एकूण ५ सामने खेळले असून ३ सामने जिंकलेले आहेत तर फक्त १ सामना हरलेले आहेत.व १ सामना बरोबरीने सोडवला आहे. तर संघाचे एकूण गुण १८ आहेत. पाटणा पायरेट्स संघाने एकूण ९ सामने खेळलेले असून फक्त ३ सामने जिंकलेले आहेत तर ६ सामने हरलेले आहेत. संघ ‘बी’ झोनमध्ये ५ व्या स्थानावर आहे. व संघाचे एकूण गुण १८ आहेत.

पाटणा पायरेट्स संघाचा कर्णधार व रेडर प्रदीप नरवाल रेड पॉईंट्स मध्ये एकूण मोसमातील पहिल्या स्थनावरील रेडर आहे. प्रदीपने ७३ सामन्यात ७२० पॉईंट्स घेतले आहे. तर दुसऱ्या स्थानावर राहुल चौधरी असून राहुलने ८५ सामन्यात ७१७ पॉईंट्स मिळवले आहेत.

आजचा सामना रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.

%d bloggers like this: