#MeToo मोहीम उत्तमच, पण त्याचा महिलांनी गैरफायदा घ्यायला नको – रजनीकांत

महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल समोर येऊन बोलत आहेत ही बाब निश्चितच चांगली आहे. मात्र या मोहिमेचा गैरफायदा कोणीही घ्यायला नको असेही रजनीकांत यांनी म्हटलं आहे.

#MeToo ही मोहिम उत्तम आहे. मात्र महिलांनी याचा गैरफायदा घ्यायला नको, असे मत अभिनेता रजनीकांतने व्यक्त केले आहे. तामिळ लेखक वैरामुथ्थु यांच्यावर देखील लॆगिंक शोषणाचे आरोप झाले आहेत. याबद्दल   विचारले असता रजनीकांत म्हणाले की , वैरामुथ्थु यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ज्या महिला आरोप करत आहेत त्यांनी पोलिसात तक्रार करावी त्यानंतर पोलीस काय ते पाहतील अशी प्रतिक्रिया देखील यांनी दिली.

माझ्या पक्षाचे नाव मी लवकरच जाहीर करेन –

रजनीकांत हे त्यांच्या आगामी पेट्टा या सिनेमाच्या शुटिंगासाठी चेन्नईत आले होते त्यावेळी तुम्ही तुमच्या पक्षाची स्थापना तुमच्या 12  डिसेंबरला म्हणजेच तुमच्या वाढदिवशी करणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता, ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. मी माझ्या पक्षाची स्थापना १५ डिसेंबर ला करणार नसून माझ्या पक्षाचे नाव देखील लवकरच जाहीर करेल.

#metoo प्रकरणात आतापर्यंत अनेक दिग्गज्यांची नावे समोर आली. नाना पाटेकर, अलोक नाथ, साजिद खान, कैलाश खैर एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले.

%d bloggers like this: