पटेलांच्या पुतळ्यानंतर आता अयोध्येत उभारणार रामाचा पुतळा?

राम मंदिरावरून देशात वातावरण तापले असताना, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावरील सुनावणी पुढीलवर्षी जानेवारीमध्ये करणार असा निर्णय दिला असताना मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 100 मीटर उंचीचा रामाचा पुतळा उभारणार असल्याचे संगितले आहे.

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या पुतल्यानंतर आता उत्तरप्रदेशात रामाचा पुतळा उभारला जाणार असल्याने चर्चा सुरू झाली आहे. हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा निर्माण करणारे शिल्पकार राम सुतार यांनाच हा पुतळा निर्माण करण्याचे काम देण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

राम सुतार यांनी योगी आदित्यनाथ यांना रामाच्या पुतळ्याची छोटी प्रतिकृती दाखवल्याचे समजते आहेत आणि ही प्रतिकृती आदित्यनाथ यांना पसंद पडली असून आता अयोध्येत रामाचा 100 मीटर उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याची योजना पुढे आणली आहे.

रामाचा भव्य पुतळा उभा करण्याची काय आहे योगींची योजना?

या योजनेअंतर्गत अयोध्येतील शरयू नदी काठी हा पुतळा उभारण्यात येणार आहे, त्यासाठी नवी अयोध्या नागरी वसण्याच्या विचार योगी सरकार आहे.

सेव्हन डी तंत्रज्ञान असलेली रामलीला आणि रामकथा सांगणारी एक गॅलरी उभारण्यात येणार आहे, त्याबरोबरच या भव्य पुटल्यासाठी सीएसआर द्वारे निधी गोळा करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरवरील सुनावणी पुढे ढकलली असताना, संघाकडून राम मंदिरावर सतत भाष्य केले जात असताना योगीच्या या निर्णयाने येणार्‍या लोकसभा निवडणुकीत राम मंदिर मुद्दा अधिक भडक होणार अशी चिन्ह आहेत.

%d bloggers like this: