रावसाहेब पाटील दानवे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज

जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रावसाहेब पाटील दानवे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दाखल करणार आहेत. सकाळी 10 वाजता शहरातील मामा चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ‘मै भी चौकीदार’ म्हणत या मिरवणुकीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री बबनराव लोणीकर, महादेव जानकर, अर्जुन खोतकर आणि विजया रहाटकर देखील उपस्थित राहणार आहेत.

“मै हु चौकिदार….” म्हणत.. भारत माता की जय चे नारे देत जिल्ह्यातील सर्वच भागातुन रावसाहेब दानवेंचे समर्थक या मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचं बोलले जात आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या महिला व युवा मोर्चाची युवा शक्तिच्या उपस्थितीत हि मिरवणूक मामा चौक जालना येथून सकाळी दहा वाजता निघणार आहे. मिरवणुकीचा समारोप जाहीर सभेत होणार आहे.

%d bloggers like this: