आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, आगळी वेगळी रूपरेषा असलेल्या या चित्रपटाची झलक प्रेक्षकांना सलमान खानच्या रेस 3 चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी पहायला मिळाली होती.

झिरोमध्ये अभिनेत्या सलमानचा ही थोडा सहभाग असल्यामुळे गेल्या रमजान ईदच्या मुहूर्तावर झिरोचा टीझर रिलीज करण्यात आला होता.

बऱ्याच कालावधीनंतर झीरोची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे याचे कारण आहे की झीरोने प्रदर्शनापूर्वीच 100 कोटी रुपये कमावले आहेत.

शाहरुख खानच्या मागील काही चित्रपटांमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र झीरोचे वितरक हक्क 100 कोटी रुपयांना विकले गेल्यामुळे झिरोने प्रदर्शनापूर्वीच शंभर कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

2 नोव्हेंबरला शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरुख खान सोबत चित्रपटांमध्ये कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर सलमान खान, काजोल राणी मुखर्जी, करिष्मा, कपूर, दिपीका पदुकोण, अशी भलीमोठी मान्यवर स्टारकास्ट     थोड्या थोड्या वेळेसाठी पडद्यावर दिसणार आहे.,दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची शेवटची झलक या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

शाहरुख खान या चित्रपटातून ‘बव्वा सिंग’ नामक बुटक्या व्यक्तीची रुपरेषा साकारतोय हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.


हे ही वाचा –

केंद्र सरकार विरुद्ध आरबीआय? केंद्र सरकार आरबीआयच्या कारभारत हस्तक्षेप- डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य

जाणून घ्या राममंदिर, शिवस्मारक, आरक्षण याबाबत काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत