#MeToo :- कोणाला हवा होता किस ? चेतन भगतने केले स्पष्ट; केला ईमेल शेअर

#MeToo मुळे बॉलीवुड हादरले असताना काही दिवसांपूर्वी लेखक चेतन भगतवर देखील लेखिका ईरा त्रिवेदी यांच्याकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. त्यावर वातावरण चांगलेच तापले असताना ईरा यांनी चेतन भगतला केलेला ईमेल भगतकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

भगत यांनी ईरा यांचा 2013 रोजी आलेला ई-मेल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत प्रश्न विचारला की,  आता तुम्हीच सांगा कुणाला कुणाचा किस घ्यायचाय?

Content Middle Property

काही दिवसापूर्वी लेखिका ईरा त्रिवेदी यांनी चेतन भगत यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यात कशाप्रकारे चेतन भगतने आपल्याला खोलीत बोलावून आपल्याला किस करण्याचा प्रयत्न केला हे संगितले होते.

त्यानंतर आज चेतन भगतने आपल्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत हे सांगण्यासाठी ट्विटरवर ईराने त्याला केलेला ईमेल शेअर केला आहे. त्यात ईराने आपल्याला मिस यू, किस यू  अशा प्रकारचे ईमेल केला आहेत हे दाखवले आहे.

याआधी तनुश्री दत्ताने देखील नाना पाटेकर याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यांच्या विरोधात तनुश्रीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर साजिद खान याच्यावर देखील असेच आरोप झाले त्यामुळे हाऊसफुल्ल 4 चे शूटिंग देखील बंद करण्यात आले.

असे कोणतेही आरोपकरून #MeeToo मोहिमेला नुकसान करू नका असे देखील त्यांनी संगितले.

चेतन भगतचे द गर्ल इन रूम 105 हे नवे पुस्तक लवकरच बाजारात दाखल होणार आहे.


हे ही वाचा- 

Youth Olympic Games 2018: भारतीय संघाचे स्वप्न भंगले, सिल्वर मेडलवर मानावे लागले समाधान

पुणेरी पलटण संघाचा दरारा कायम, हरियाणा स्टिलर्सवर दणदणीत विजय


 

Paint Ad
%d bloggers like this: