तर अजितदादांना धरणाच्या आसपास फिरू देऊ नका : उद्धव ठाकरे

शिरूर लोकसभा मतदार संघाच्या वतीने राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात शिवसेनेचा शेतकरी मेळावा घेण्यात आला, या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून साकारलेल्या हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या शिल्पाचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रवादीवर साधला निशाणा – 

‘धरणं सुकली आहेत जर शिरूरमध्ये दुष्काळ जाहीर झाला तर अजितदादांना धरणाच्या आसपास फिरू देऊ नका’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, ‘एकदा काकांना विचारा राफेलला नक्की पाठिंबा आहे की विरोध आहे.’

सत्ताधारी भाजपविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला कर्जमुक्ती हवी होती मात्र सरकारने कर्जमाफी केली आहे. माझा उघड कारभार आहे, मी सरकारवर आसूड ओढायचाय म्हणून बोलत नाही, ज्यांची कर्जमाफी झाली त्यांची यादी जाहीर करा. मी सरकारच्या विरोधात बोलत नाही शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतोय असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी मांडले.

या शेतकरी मेळाव्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, आमदार नीलम ताई गोरे, आमदार सुरेश गोरे व इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

%d bloggers like this: