संपूर्ण देशात फटाके वाजवण्याची मुदत फक्त रात्री 8-10, फटक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी – सर्वोच्च न्यायालय

विक्रेत्यांकडे फटाके विकण्याची परवानगी असणे आवश्यक

देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर आज न्यायालयात एकत्रित सुनावणी करण्यात आली. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे न्यायालयाने मागीलवर्षी दिल्ली आणि आसपासच्या भागात फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

वायु प्रदुषणावर निर्बंध आणण्यासाठी देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी अशी याचिका न्यायालयासमोर मांडण्यात आली होती, परंतू न्यायालयाने देशभरातील फटाके विक्रीवर पूर्णता बंदी घालता येणार नसून काही नियम आणि शर्तीच्या आधारे फटाके विक्री करण्याची मुभा दिली आहे.

दिवाळीत रात्री 8-10 यावेळतच फटाके वाजवता येणार – 

असे असेल तरी सामान्यांना दिवाळीत रात्री 8-10 यावेळतच म्हणजे फक्त 2 तास फटाके वाजवता येणार आहेत, रात्री 10 नंतर फटाके वाजवल्यास पोलिस कारवाई होऊ शकते.  तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला रात्री 11. 45 ते 12.15 म्हणजे फक्त 30 मिनिट फटाके वाजता येणार असल्याचे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी – 

असे असेल तरी न्यायालयाने मात्र ऑनलाइन फटाके विक्रीवर निर्बंध घातले असून आता ऑनलाइन फटाक्यांची विक्री विक्रेयांना करता येणार नाही.

सुनावणी वेळी केंद्र सरकारने देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यास विरोध केला होता. फटाक्यांवर एकदम बंदी घळण्याऐवजी फक्त मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालता येतील, अशी भूमिका केंद्र सरकारनकडून मांडण्यात आली होती.

विक्रेत्यांकडे फटाके विकण्याची परवानगी आवश्यक – 

न्यायालयाने आपल्या आदेशात असे देखील संगितले की, मोठ्या आवाजाच्या फटक्यांवर बंदी असून जे फटाके वायुप्रदूषण कमी करतील आणि सुरक्षित असतील असे फटाके विकण्यास न्यायालयाने विक्रेत्यांला परवानगी दिली आहे. परंतू या विक्रेत्यांकडे फटाके विकण्याची परवानगी असणे गरजेचे आहे.

याचिकाकर्त्यांकडून फटाके विक्रीवरील बंदीचे समर्थन करताना असे सांगण्यात आले की, फटाके उडवण्यातून होणार्‍या प्रदूषणाचा परिणाम तरुण पिढीवर होत आहे. प्रदूषण वाढत आहे, त्यामुळे फटाके विक्रीवर बंदी घालणे योग्यच असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

फटाके विक्रेता आणि उत्पादक संघटनांच्यावतीनेही न्यायालयात आपली बाजू मांडताना असा युक्तिवाद केला होता की ‘प्रदूषणासाठी फक्त फटाकेच कारणीभूत ठरत नाही, तसेच बंदी घालण्यात आली तर लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागेल.’

फटाके बंदीचा आदेश धर्मांसाठी लागू –

फटाके बंदीचा आदेश हा सर्व धर्मांसाठी लागू असेल असे देखील न्यायाधीश  ए. के. सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आज दिला.


हे ही वाचा – 

छत्तीसगड – अटल बिहारी वाजपेयी यांची भाची भाजप विरोधात मैदानात, मुख्यमंत्र्यांविरोधात लढणार निवडणूक

माझा पक्ष आणि पक्षप्रमुख बैलगाडा संघटनांच्या मागे ठामपणे उभे :- खा.शिवाजीराव आढळराव पाटील


 

%d bloggers like this: