वायनाडमधून राहुल गांधींच्या विरोधात लढणार भाजपचा ‘हा’ उमेदवार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधीलवायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली असतानाच आता भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही वायनाडमधील आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

वायनाडमधून एनडीएचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना (बीडीजेएस) चे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

%d bloggers like this: