आईचे पाय भाजत आहेत हे पाहून उद्यनराजे पुढे सरसावले


सातारा –  आपल्या हटके स्टाईलसाठी व वक्तव्यासाठी कायमच चर्चात असणाऱ्या उद्यनराजे यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उद्यनराजे यांच्या सोबत त्यांच्या आई म्हणजेच कल्पनाराजे भोसले देखील उपस्थित होत्या. यावेळी दुपारच्या कडक उन्हात कल्पनाराजे भोसले यांनी शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले. पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी गेल्या असताना  त्यांनी चप्पल काढली, परंतू त्यांचे पाय उन्हाने भाजायला लागल्याने लगेचच राजे त्यांच्या मदतीसाठी धावून आले. मातोश्रीचे पाय भाजताय हे पाहून त्यांनी लगेचच मातोश्रीच्या पायात चप्पल घालण्यासाठी चप्पल पुढे केली. आईला व्याकूळ होताना पाहून उद्यनराजे यांनी दाखवलेली तत्परता पाहून त्यांचे सोशल मीडियावर देखील चांगलेच कौतुक होत आहे.

%d bloggers like this: