हिंदू दहशतवादाच्या पापातून काँग्रेसला कधीही मुक्ती मिळणार नाही – नरेंद्र मोदी

वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्दावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदू आतंकवाद शब्द ऐकून तुम्हाला दु:ख झालं नाही का ? हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. काँग्रेसने हिंदुंना अपमानित करण्याचं पाप केलं. सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला. हिंदू दहशतवादाच्या पापातून काँग्रेसला कधीही मुक्ती मिळणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

या देशातील कोटयावधी लोकांवर हिंदू दहशतवादाचा डाग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी सुद्धा हिंदू हिंसक होऊ शकतात याचा उल्लेख केलेला नाही असे मोदी म्हणाले.

%d bloggers like this: